Friday, 22 September 2017

एक विदारक सत्य....

        सीमाच्या आक्रोशाने आज पूर्ण वातावरण भरुन गेलं होतं. आज ती वारंवार स्वतःलाच दोष देत होती. मी तिथे का नव्हते? मी तिथे का नव्हते? असे रडत ओरडत ती तुटत तुटत बोलत...
         सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती कोणाचेच ऐकत नव्हती वेड्यासारखी करत होती आणि मोठमोठ्याने एकसारखी रडत होती.
          नियतीने आज ड़ाव साधला होता आणि तिच्या पोटच्या गोळ्यावर काळाने घाला घातला होता. सीमाला दोन मुले नवरा बायको असे चौकोनी कुटुंब अगदी लाड़ाकोड़ात वादलेली मोठी स्वीटी आणि एक मुलगा. घरातील मोठी मुलगी सुरवातीला ती घरात एकटीच मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्व हौस-मौज लहानपणापासूनच पुरवलेली त्यामुळे की काय ,थोडी हट्टी स्वभावाने अतिशय हुशार, देखणी आणि सर्वांचीच ती लाडकी.
           गुलाबी मोहक रंग घारे-घारे डोळे. धारदार नाक आणि कुरळे-कुरळे केस. दोन-तीन वर्षांची असताना तिच्या सुंदर लुक मुळेच सर्व तिला स्वीटी म्हणू लागले व पुढे तिचे खरे नाव शाळेखेरीज कोणालाही माहीत नव्हते. सर्वजण स्वीटी म्हणूनच ओळखत असत.
           तेजस्वी डोळे आणि कमालीची हुशार कोणतीही गोष्ट एकदा सांगितलेली ती कधीच विसरत नसे. तिच्या जन्मतःच हुशारीमुळे इग्लिश मिडियम मध्ये  अॅडमिशन घेतले.सर्व प्रकारच्या काॅम्पीटीशन मध्ये तिचा सहभाग असे. वडील महाराष्ट्र पोलिस मध्ये उच्च पदावर होते. आणि सीमा उच्चशिक्षित असुन देखील मुलांच्या संगोपनासाठी घरीच ट्युशन घेत होती. इच्छा असुन देखील मुलांसाठी तिने नोकरी केली नाही.
           जीवनातल्या पहिल्या शब्दापासूनच ती आईजवळ शिकलेली. आताशा दोघी एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. न सांगता ही मनातले भाव चेहरा पाहूनच ओळखत असे.
            दहावीच्या परीक्षेत तिला 90% गुण भेटले तेव्हा तर घरातील सर्वांना आकाशच ठेंगणे झाले. पुढे कोणत्या  शाखेला जायचं? या विषयी चर्चा वादविवाद झाल्यानंतर शेवटी तिने तिच्या हट्टाने आर्ट्स साईड निवडली. तसं तिला कोणत्याही शाखेत अॅडमिशन भेटलं असतं पण तिला IPS अधिकारीच व्हायचं होतं. 
            मागच्याच आठवड्यात तिझी आणि माझी भेट झाली होती. तिने गोल्डन रंगाचा ड्रेस घातलेला ,गळ्यात  नाजुकशी मोत्यांची सर, हातात सुंदर ब्रेसलेट. आणि एकमेकांकडे आठवणी म्हणून खूप सेल्फीज् ही काढल्या. त्या वेळेसच्या भेटेनंतर भेट झाली तर आजच.
            सकाळी आठच्या सुमारास माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिचे शब्द ऐकून मी अगदी सुन्न झाले. "अगं तुला समजलं का? स्वीटी गेली......" तिचा आवाज कापरा झाला होता. काय बोलावे हे ही सुचत नव्हते. ती कसेबसे एवढेच बोल्ली आणि फोन ठेवून दिला.
             चार दिवसांपूर्वीच तिला ताप आला होता. ताप जास्त नव्हता आणि शनिवार-रविवार आल्यामुळे तिने तो अंगावर काढला होता. सोमवारी मात्र तिला लगेचच दवाखान्यात घेऊन गेले..जाताना रस्त्यात एक उल्टी झाली. आणि तिला डाॅक्टरांनी दोन दिवस ICU मध्ये ठेवले.आता ती बरी झाली होती.
             संध्याकाळी डाॅक्टरांनी कोणाला तरी एकालाच थांबायला लावल्यामुळे वडील तिच्या जवळ थांबले व आई घरी. आई येताना ती फार रडत होती. "तू नको जाऊस!!
              ICU मध्ये ठेवल्याने ती प्रचंड घाबरली पहिल्या पासूनच तिला दवाखान्याची खूप भिती वाटत असे. किती काहिही झाले तरी ती दवाखान्यात कधी जात नसे. गेल्यापासून तीने आईचा हात सोडला नव्हता  आणि आईलाही तिची ती सवय माहीत होती. त्यामुळे ती देखील एक क्षण सुद्धा तिला सोडून हल्ली नव्हती. दोन दिवस सलग रात्रंदिवस ती स्वीटीच्या जवळ बसलेली .
               आता तिला थोडं बरं वाटायला लागल्यामुळे सर्वांनी घरी जाण्यासाठी खूप आग्रह केला.तरीही तिला यायचे नव्हते. शेवटी फार निकराने ती घरी जाण्यास निघाली तरी तिचे पाउल उठत नव्हते. निग्रहाने कशीबशी निघाली.आल्यानंतर ही सुचेनासे झालेली ही सर्व जन स्वीटी बद्दलच विचारत होते. ती शरीराने घरी असलं तरी मनाने तिथेच होती. तिच्या डोळ्यासमोरुन काहीकेल्या स्वीटीचा चेहरा नव्हता........
               कधीतरी पहाटे तिचा डोळा लागला आणि तिला एक भयंकर स्वप्न पडले. स्वीटी तिला झोपेतून उठवत होती....आई मी निघाले.....आई मी जातेय...... सीमा घामाने भिजुन गेली....दचकूनच उठली हातपाय थंडगार पडलेले.....
              एवढ्यात फोन ची रिंग वाजली....तिला दवाखान्यात बोलावलेले.....स्वीटी कशीतरीच करत होती आणि आईला बोलवत होती......ती आहे अशीच उठुन गेली.....
               ती जाईपर्यंत स्वीटी मात्र तिला सोडून गेली होती....कायमची .....परत कधी न भेटण्यासाठी......
             

Heaven!💜

Can u feel a building reciting a poetry? Can u feel a building narrating a story? When I look back at some of my school memories a stal...